फलटण/बिबी: वाघजाईनगर (बिबी) गावामध्ये राजकीय वारं फिरलं असून, शिवसेना (राजे गट) ची ताकद आता अधिक भक्कम झाली आहे. केवळ आश्वासने देणाऱ्या विरोधकांना चपराक लगावत, गावातील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी विकासकामांवर विश्वास ठेवून शिवसेना (राजे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे वाघजाईनगरमध्ये विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
या सोहळ्यासाठी शिवसेना (राजे गट) चे प्रमुख नेते मा. श्री. विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, श्री. धैर्यशील दत्ता (बापू) अनपट आणि डॉ. संतोष कारंडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना नेत्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.
"शिवसेना (राजे गट) ही केवळ राजकारण करणारी संघटना नसून, सामान्यांच्या हक्कासाठी लढणारी एक जिवंत चळवळ आहे. आम्ही कामावर विश्वास ठेवतो, पोकळ शब्दांवर नाही."
— नेत्यांचे परखड मत
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी गावातील विकासकामांचा पाढा वाचला. रस्ते, मूलभूत सुविधा आणि युवकांसाठीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना (राजे गट) सदैव तत्पर राहिली आहे. यावेळी ग्रामस्थांनी विचारलेला एकच प्रश्न चर्चेचा विषय ठरला: "जिथे राजे गटाने प्रत्यक्ष काम केले, तिथे विरोधक फक्त भाषणबाजीतच का अडकले?"
या प्रवेश सोहळ्यामुळे गावातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आगामी काळात शिवसेना (राजे गट) अधिक आक्रमकपणे जनहिताची कामे मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.