राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानातील काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाल्याचे समजते.
तीन जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डिसीजीने दिली आहे. विमान जळून खाक झाल्याची माहिती आहे.
मुंबईहून अजित पवार बारामतीत सभेसाठी येत होते. विमान लॅंडिंग होत असताना हा अपघात झाला. अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते.
त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने हे विमान आदळल्याने त्या विमानाला आग लागली, असे प्रथमदर्शनी समजते आहे.
या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस व मदत यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
हा अपवाद नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळत नाही, मात्र वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ माजली असून बारामतीकरांनी अपघात ग्रस्त ठिकाणाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असून अजित पवार यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे या घटनेने बारामतीकरांना कमालीसा धक्का बसला आहे.