पिंपरी(प्रतिनिधी) वाकड येथील आयआयईबीएम संस्था संचलित इंडस बिझनेस स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला "पराक्रम" वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यामध्ये क्रिकेट, खो- खो ,कब्बडी ,बॅडमिंटन , हॉलीबॉल टेबल,टेनिस ,चेस ,कॅरम, मैदानी व 10 किलोमीटर मॅरेथॉन इतर २३ खेळांचा समावेश होता.त्याचे वार्षिक पारितोषिक वितरण आज संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मृदुल नागपाल आणी व्यवस्थापकीय संचालक डॉ.जयसिंग मारवाह यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्रक ,पदक ,स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. जय सिंग मारवाह म्हणाले कि विद्यार्थ्यांमधील गुणांना वाव देण्यासाठी शाळा व महाविद्यालय स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले तर उद्याची पिढी ही निरोगी व सशक्त बनेल त्यामुळे मैदानी खेळ खेळले पाहिजेत आणी यातूनच उद्याचा अभिनव बिंद्रा खाशाबा जाधव हे आपल्या भारताला मिळू शकतील खेळात हार जीत हि होतच असते. जिंकण्यासाठी स्पर्धेत सहभागी होवू नका तर खेळाचा आनंद घेण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे असे त्यांनी नमूद केले
यावेळी अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, सह अधिष्ठाता डॉ विशाल भोळे, संचालक प्रशासन कर्नल रविंद्र कुमार, संचालक राजीव सिंग, क्रीडा समिती प्रमुख , प्रा.सदानंद पेटकर, प्रा.विशाल देसाई, संदीप कणसे समन्वयक बापू पवार, सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी विध्यार्थी यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.