फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषि संशोधन परिषद, पुणे तर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील पदव्युत्तर पदवी एम. एस. सी. कृषि प्रवेशासाठी सामाईक कृषि प्रवेश परीक्षा 2025-26 मध्ये घवघवीत यश मिळवून पदव्युत्तर पदवी कृषि शिक्षणासाठी कृषि विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाल्याने दोन्ही महाविद्यालयाचे राज्य स्तरावर नावलौकिक वाढविण्यात आला आहे. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातून जून 2025 मध्ये पदवी पुर्ण केल्या नंतर कुमार कार्तिक कदम या विद्यार्थ्याने सामाईक कृषि प्रवेश परीक्षा 2025-26 मध्ये एम. एस. सी. कृषि साठी राज्यातून 11 वी रँक मिळवून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे बीज तंत्रज्ञान या विषयामध्ये प्रवेश मिळविला, कुमारी अनघा शिंदे या विद्यार्थिनीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन या विषयामध्ये प्रवेश मिळविला आणि कुमारी साक्षी जाधव या विद्यार्थिनीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील वनीकरण या विषयामध्ये प्रवेश मिळविला, कुमार विनायक खुणे या विद्यार्थ्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील फळ शास्त्र या विषयामध्ये प्रवेश मिळविला आहे. कृषि महाविद्यालयातील कुमारी आकांक्षा जाधव या विद्यार्थ्यानीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रवेश मिळविला, कुमारी संजना वाघमारे या विद्यार्थ्यानीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र या विषयामध्ये प्रवेश मिळविला, कुमारी मोनिका पाटील या विद्यार्थ्यानीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील उद्यानविद्या या विषयामध्ये प्रवेश मिळविला, कुमार यश मेश्राम या विद्यार्थ्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र या विषयामध्ये प्रवेश मिळविला आहे. कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सामाईक प्रवेश परीक्षा तयारी साठी विशेष असे मार्गदर्शन लाभले. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर पदव्युत्तर पदवी कृषि शिक्षणासाठी कृषि विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाल्याने दोन्ही महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविल्याबद्दल मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन, मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण, मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, महाविद्यालयीन समिती सदस्य, श्री. अरविंद निकम, प्रशासकीय अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. यु. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, फलटण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*(शब्द संकलन - डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि विस्तार विभाग)*