फलटण प्रतिनिधि:महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचा २२वा वर्धापन दीन मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्यनारायण पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा २१ वर्षाचा प्रगतीचा आढावा सादर केला. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना कृषि व उद्यानविद्या क्षेत्रातील शिक्षण घेता यावे या उद्देशाने ४ नोव्हेंबर २००३ रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत फलटण येथे उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यात आले, २००३ पासून आजपर्यंत कृषि व उद्यानविद्या क्षेत्रात विकासाच्या व प्रगतीच्या अनेक पायऱ्या या महाविद्यालयाने पार केल्या आहेत. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयात उद्यानविद्या शास्त्राशी संबधित व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवला जातो. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना उद्यानविद्या व कृषि क्षेत्रामधील शिक्षण, नवनवीन कृषि संशोधन व तंत्रज्ञान संबधित व्यावसायिक मार्गदर्शन, कृषि उद्योजकता विकास व व्यवसाय, प्रगतशील शेती तसेच प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते तसेच महाविद्यालयातील बऱ्याच माजी विद्यार्थ्यांची कृषि क्षेत्रासंबधीत व्यवसाय, रोजगार व उच्चतम अधिकारी पदावर निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील शेती संबधित व्यवसाय व उद्योग धंदे, प्रगतशील शेती तंत्रज्ञानात व प्रशासकीय सेवेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अधिकतम सहभाग व्हावा या दृष्टीने महाविद्यालय कायम प्रयत्नशिल व अजून महाविद्यालयाची प्रगती व विकास कसा होऊ शकतो यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर सदैव प्रयत्नशील आहेत. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी शिस्त व हेतू बघता महाविद्यालयास उच्चतम शिखरावर प्रगती करत आहे असा विश्वास दिला.
सदरील कार्यक्रमाला मे. गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, श्री. रणजित निंबाळकर, महाविद्यालयीन समितीचे व्हॉइस चेअरमन श्री. शरदराव रणवरे, सदस्य श्री. रामदास कदम, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. महादेव माने, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण उपस्थित होते. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या २२व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मे. गव्हर्निंग काँसिलचे सभासद सदस्य, प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.