21 वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवा महोत्सव" "इंद्रधनुष्य 2025
फलटण प्रतिनिधि:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे दिनांक 5 नोव्हेंबर ते 09 नोव्हेंबर 2025 या कालावधीत संपन्न झाला. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला 16 पारितोषिकांसह सांघिक उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला यामध्ये मुधोजी महाविद्यालयातील विद्यार्थी कलाकार प्रणव अवटे याने लोकसंगीत वाद्यवृंद या कला प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक तसेच "सांस्कृतिक शोभायात्रा " द्वितीय क्रमांक मिळवला तसेच मध्यवर्ती युवा महोत्सवात प्रथम आलेल्या *"Wisdom" या मुधोजी महाविद्यालयाच्या लघुपटाला (Short Film)25 विद्यापीठातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी
गणेश लिंबरकर, सानिका जावळे,साहिल अहिवळे, आदित्य वाघमारे, आर्यन बडेकर ,ओंकार दाणे,आदित्य रणदिवे, निकिता आगवणे, सुजल जगताप, प्रसाद हळबे,इंद्रजीत माने या सर्व कलाकारांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष मा. प्राचार्य विश्वासराव देशमुख, चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम सरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.