फलटण प्रतिनिधि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण आयोजित अंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव क्रीडा स्पर्धा 2025-26 चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले. यानंतर अंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव क्रीडा स्पर्धा 2025-26 मधील सहभागी खेळाडू कुमार वैष्णवराज पाटील, कृषी महाविद्यालय पुणे याने क्रीडा स्पर्धेमधील अनुभव व्यक्त करून मनोगत व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्रतिनिधी कृषि महाविद्यालय, पुणे येथील क्रीडा अधिकारी डॉ. ए. जे. नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. के. के. वाघ कृषि महाविद्यालय, नाशिक येथील क्रीडा अधिकारी प्रा. सुनिल निरगुडे, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी येथील प्रा. आर. बी. सिड यांनी आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त केले. अंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव क्रीडा प्रकारात श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा कुमार सुरज काळेल याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा कृषि श्री हा बहुमान मिळवला. अंतर महाविद्यालयीन कुस्ती क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान कृषी महाविद्यालय बारामती यांनी मिळविला, द्वितीय क्रमांकाचा बहुमान श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालया यांनी मिळाविला, तृतीय क्रमांकाचा बहुमान छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांनी मिळविला. अंतर महाविद्यालयीन वजन उचलणे क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान कृषि महाविद्यालय, पुणे यांनी मिळविला, द्वितीय क्रमांकाचा बहुमान कृषी महाविद्यालय, बारामती यांनी मिळविला, तृतीय क्रमांकाचा बहुमान राजर्षी शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर यांनी मिळविला. विद्यापीठ स्तरीय अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन व नियोजन आयोजकांकडून उत्कृष्टरित्या करण्यात आले, क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थी जीवनातील आत्मविश्वास वाढतो, खेळाडू वृत्ती जोपासण्यास मदत होते, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नियमितपणा वाढण्यास मदत होते, या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे श्री. भोजराज नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांना संबोधताना व्यक्त केल्या. फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी उपस्थितांना संबोधन करताना क्रीडा हा विद्यार्थी जीवनातील अविभाज्य भाग आहे, क्रीडामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत होते, क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. सदरील पारितोषिक वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयीन समितीचे व्हाईस चेअरमन श्री. शरदराव रणवरे यांनी मनोगत व्यक्त करताना श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांनी अंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या तसेच सर्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्कृष्ट केले, दोन्ही महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा संपन्न होण्यासाठी कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडली असे प्रतिपादन उपस्थितांना केले. सदरील क्रीडा स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत एकूण 31 महाविद्यालयांमधून कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी 98 खेळाडू, वजन उचलणे क्रीडा स्पर्धेसाठी 67 खेळाडू, शरीर सौष्ठव क्रीडा स्पर्धेसाठी 70 खेळाडू सहभागी झाले. पारितोषिक वितरण समारंभासाठी मान्यवर म्हणून श्री. शिरीषशेठ दोशी, मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, प्रा. आर. बी. बोरसे, क्रीडा अधिकारी, कृषि महाविद्यालय, कोल्हापूर, सहभागी महाविद्यालयाचे सर्व क्रीडा अधिकारी, प्रा. रोशन सोडमिसे, क्रीडा अधिकारी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी अपुर्वा जगताप व कुमारी श्वेता रासकर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा. एन. एस. खुरंगे यांनी व्यक्त केले. अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली.
*(शब्द संकलन : डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि विस्तार विभाग)*