सातारा, दि. 10:जिल्हास्तरीय शाळा तपासणी समितीच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपालिकांतर्गत शाळांच्या भौतिक सुविधा तपासणीअंतर्गत सातारा तालुक्यामधील सांबरवाडी, येवतेश्वर व अंबाणी येथील जिल्हा परिषद शाळांना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता याचा आढावा घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.या पाहणी प्रसंगी त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, बांधकाम विभागाचे उप अभियंता आकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिता जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय जाधव आणि केंद्र प्रमुख छाया कदम आदी उपस्थित होते.पाहणी दरम्यान, शाळेच्या भौतिक सुविधांची, जसे की वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, ग्रंथालय आणि खेळाचे मैदान यांची समितीमार्फत तपासणी करण्यात आली. शिक्षणाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापन पध्दती, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता यांचे निरीक्षण करण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगती व अडचणींबाबत माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शासनाकडून शाळांना पुरविण्यात आलेल्या स्मार्ट टी.व्ही. व इतर शैक्षणिक साहित्याच्या वापराबाबत तसेच स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती, पुरेशा पाण्याची व्यवस्था आदी बाबत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. शैक्षणिक बाबतीतही त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन के
ले.