खटकेवस्ती (गोखळी), २७ सप्टेंबर २०२५:श्री सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय मर्या., गोखळीतसेच महालॅब व प्राथमिक आरोग्य केंद्र बरड यांच्या वतीने खटकेवस्ती येथे दिनांक २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या महिला आरोग्य शिबिराला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.या शिबिराचे नियोजन डॉ. शिवाजी गावडे यांनी गावातील प्रॅक्टिशनर डॉ. अमोल आटोळे, डॉ. नितीन गावडे, डॉ. हनुमंत गावडे, डॉ. प्रियांका गावडे, डॉ. विराज गोफणे तसेच लॅब टेक्निशियन श्री. सोमनाथ वायसे व श्री. रोहित इवरे यांच्या सहकार्याने केलेशिबिरात अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांनी महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची सखोल तपासणी केली.डॉ. सरोजिनी खोमणे (MD आयुर्वेद) यांनी महिलांना उपवास करणे मुलांची नातवांची चिंता करणे आहाराकडे दुर्लक्ष करणे याचे कळत नकळत आरोग्यावर परिणाम होतात..सदृढ माता असेल तर संतती पण सदृढ होते..ग्रामीण भागात तंबाखू मिश्री चे वाढते प्रमाण घातक आहे.. रक्ताचे प्रमाण ही घटत आहे त्यामुळे आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे डॉ. राजेश कोकरे (स्त्रीरोग तज्ञ) यांनी अॅनिमिया व HPV लस यावर मार्गदर्शन केले. खास करून हिरव्या पालेभाज्या दूध गुळ काकवी तसेच जे मांसाहारी आहेत त्यांनी अंडी मांस खावे... हिमोग्लोबीन 12 gm पेक्षा अधिक हवा.. मुलीसाठी serum इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने विकसित केलेल्या HPV वॅक्सिन मुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळता येतो.. याची किंमत आता कमी केली आहे.. लग्नात इतर गोष्टी एवजी या लसीचे डोस पूर्ण करून द्या तिचे सर्व्हिकल कॅन्सर पासून संरक्षण करा असा सल्ला दिला डॉ. पांडुरंग गावडे (अस्थिरोग तज्ञ) यांनी हाडांच्या आजारांबाबत तपासणी केली व त्यांच्या "गावडे हॉस्पिटल, बारामती" टीम मार्फत १५००रुपयांची तपासणी ३०० महिलांची Bone Density तपासणी मोफत करून दिली.. एकंदर सर्व रिपोर्ट पाहता हाडे ठिसूळ असण्याचे प्रमाण खूप असून यामध्ये योग्य आहार आणि व्यायामाचा अभाव असणे ही मुख्य कारणे आहेत.. अगदी लहानपणी पासून मुलांना कोवळे उन मिळत नाही.. फास्ट फूड खाणे बेकरी पदार्थ रोजच खाऊन मुले स्टिंग सारखे पेय पित आहेत.. जात्यावर दळणे लोखंडी तव्यात भाज्या करणे मिक्सर एवजी पाटा वरवंटा वापरणे.. नाचणी बाजरी सारखे तृणधान्य फळे दूध अंडी हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक असून व्यायामाची सवय लहान वयातच लावायली हवी.. व्हिटॅमिन डी कॅल्शियम व हिमोग्लोबीन व रक्त शर्करा तपासणी साठी सुमारे 150 सँपल घेतली आहेत त्याचे रिपोर्ट आले की फॅमिली डॉक्टरना दाखवून सल्ला घ्यावा . असे डॉ पांडुरंग गावडे यांनी स्पष्ट केले..डॉ. आशुतोष आटोळे (दंतरोग तज्ञ) यांनी ओरल कॅन्सरचा वाढता धोका यावर माहिती दिली लोक दात घासतात वास्तविक दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यासाठी सॉफ्ट ब्रश वापरा. दात आणि जीभ तसेच मौखिक कर्करोग आपल्या तालुक्यात अधिक आहेत.. त्यातच पाण्याचे प्रदूषण अधिकची रासायनिक खते कीटकनाशके याचा परिणाम म्हणून नीरा नदीचे खोरे कॅन्सरग्रस्त होत आहे सेंद्रिय शेती स्वतः पुरती तरी करावी. , तर डॉ. संयुक्ताराजे खर्डेकर यांनी आजारा बरोबर चं रुग्णांची मानसिकता त्याला जास्त रोगी करते याविषयी मानसिकतेवर मार्गदर्शन केले. रोग झाला की खास करून कर्करोग तर भीती ने अशा रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती कमी होते..त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावी आणि वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. एक गोष्ट स्पष्ट जाणवते ग्रामीण महिला पूर्वीप्रमाणे राहिल्या नसून त्या पुढे येऊन स्वतःच्या आरोग्याच्या समस्या सांगत आहेत हे चांगले होत आहे.. वेळीच समस्या समजली तर इलाज ही लवकर करता येतात आणि कॉम्प्लिकेशन होत नाहीत.. परिसरात कोणालाही समुपदेशनाची गरज असेल तर ते मी आनंदाने करेन. डॉ शिवाजी गावडे आणि रामभाऊ गावडे यांनी आज आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार... त्यांनी व्यक्त केले.. डॉ विराज गोफणे यांनी दंतरोग तपासणी करून गरजू व्यक्तींना मोफत x ray करून दिले.. डॉ. निखिल गावडे यांनीही व बालरोग विषयक तपासण्या केल्या.डॉ. स्वप्नांली गावडे (MD आयुर्वेद) यांनी आयुर्वेदिक आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.शिबिरात महालॅब आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, बरड यांच्या मदतीने ब्लड प्रेशर, शुगर, रक्तातील हिमोग्लोबिन, थायरॉईड तपासण्या करण्यात आल्या.शिबिरात लोह, कॅलशियम डायबेटीस ब्लड प्रेशर ची औषधं सब सेंटर गोखळी यांच्या वतीने पेशन्ट ना देण्यात आल्या सौ. प्रज्ञा लोंढे, डॉ. सानिया शेख, परवते सिस्टर, सिस्टर शिंदे, सिस्टर केतन चव्हाण व सौ. संगीता मचाले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.या आरोग्य शिबिराचे आयोजन रामभाऊ नाना गावडे व जय तुळजाभवानी उत्सव मंडळ, खटकेवस्ती यांच्या सहकार्याने करण्यात आले. रक्त तपासणी साठी सोमनाथ वायसे व रोहित इवरे सहकार्य केले.. तर निलेश नानासो गावडे यांनी औषध वाटप केले.. या शिबिरासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी मोफत औषधे उपलब्ध करून दिली.त्यामध्ये सिस्टॉपीक, अल्केम, macleods, अरिस्टो, CSM या pharma कंपन्या आहेत गावातील महिलांनी शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला असून, या उपक्रमामुळे सामान्य महिलांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे एक प्रेरणादायक उदाहरण घडले आहे.मोफत उपचार व निदान करण्यासाठी आलेल्या सर्व स्पेशालिस्ट डॉक्टर मित्रांचा सत्कार जय तुळजा भवानी मंडळ व सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय गोखळी यांच्या वतीने सौ आशाताई खटके सौ कल्याणी गावडे तसेच दत्तात्रय गावडे पाटील खटकेवस्ती चे पोलिस पाटील धुमाळ तसेच हनुमंत खटके व रामभाऊ गावडे नाना यांनी सत्कार केला..