फलटण: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) फलटण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या सूचनेनुसार, मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी शहराच्या काही भागात वीजपुरवठा खंडित राहणार आहे. एचटी/एलटी लाईन आणि डीटीसी मेंटेनन्सच्या कामासाठी सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या परिसरांमध्ये वीजपुरवठा बंद:
२२ केव्ही फलटण शहर वाहिनीवरील भाग: मलठण, जिंतीनाका, शेतीशाळा, स्वामी विवेकानंद नगर, बिरदेवनगर, ताममाळ, भडकमकर नगर, पद्मावतीनगर, बारस्कर गल्ली, यांसह इतर परिसर.
२२ केव्ही वाय.सी. फिडरवरील भाग: कोळकी, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, मार्केट यार्ड, यांसह इतर परिसर.
महावितरणने ग्राहकांना या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जर दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाले, तर नियोजित वेळेपूर्वीही वीजपुरवठा सुरू केला जाईल, असेही या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्व संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी.