सातारा: महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील जागांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी सोडत पध्दतीने विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
सोडत सभेचा तपशील
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष सभांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
सर्व संबंधित व्यक्तींनी आणि नागरिकांनी या जाहीर केलेल्या सभेच्या ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.