फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत सगुना माता माध्यमिक विद्यालय दालवडी येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आहार व व्यायाम याविषयी आयोजित व्याख्यानात डॉक्टर रवींद्र बिचुकले बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम उपस्थित होत्या उपस्थित विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी श्रीमंत संजीव राजे यांची व्यायामाची आवड त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या विद्यालयात केलेल्या त्यांचं कार्य याबद्दलची माहिती सांगितली त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे औचित्य त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंदुरुस्त शरीरासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले यातून त्यांचे ग्रामीण भागावर चे लक्ष अधोरेखित होते हे स्पष्ट केले विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी नियमित व्यायामाचे महत्त्व सांगितले नियमित व्यायाम व संतुलित आहार यामुळे आपले शरीर तंदुरुस्त होते शरीर तंदुरुस्त असेल तर मन तंदुरुस्त होते आणि शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त असेल तर आपल्या हातून होणार प्रत्येक कार्य दर्जेदार होते आपल्याला अभ्यासासाठी तंदुरुस्ती आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले वेगवेगळ्या सुभाषितांचा व आयुर्वेदातल्या दाखल्यांचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला व विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्तीचे महत्व चांगल्या प्रकारे रुजवले अध्यक्ष मनोगतात सौ कांबळे मॅडम यांनी श्रीमंत संजीव राजे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला त्यांचे राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य विशद केले शिक्षण क्षेत्रामध्ये अंगणवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत तालुक्यातल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सुविधा विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या व बाबांचे आपल्या विद्यालयावर असणारे प्रेम आणि त्यातून मिळणाऱ्या सुविधा विशद केल्या कार्यक्रमाचे आभार शिक्षक प्रतिनिधी श्री कोलवडकर सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी श्री सूळ सर श्री पाडवी सर श्री जाधव सर माने मॅडम सो मोहिते मॅडम तरटे मॅडम श्री इतराज श्री कारंडे व इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते