गोखळी: विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहूर्तावर गोखळी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या तात्पुरत्या कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. हे कार्यालय शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी व त्यांच्या समस्या निवारणासाठी उभारण्यात आले आहे.ढवळेवाडी गावचे प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय साळुंखे मामा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पूजन करून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे कार्यालय भोसले हॉस्पिटलसमोर तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित झाले आहे.यावेळी राजेंद्र फाळके, ज्ञानदेव काशीद, अशोक भाऊ गावडे, महिंद्रा अण्णा गावडे, सागर गावडे, दिलावर शेख, डॉ. संदीप गावडे, योगेश हरिहर, सुरज भैय्या गावडे, सचिन दादा गावडे, शिवाजी पवार, रेश्मा कांबळे, मालन मोरे, योगेश जाधव, गणेश भोईटे, युवराज कांबळे, गणेश गावडे, शुभम गावडे, अनिल गावडे, अजित आटोळे, घाडगे महाराज, प्रवीण गावडे, आकाश घाडगे, गौरव अडागळे इत्यादींसह पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे कार्यालय सुरू करण्यासाठी ज्यांनी जागा (गाळा) उपलब्ध करून दिली, त्या डॉ. संदीप गावडे यांचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावेळी विशेष आभार मानण्यात आले. या कार्यालयातून सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी काम केले जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.