फलटण: पुणे येथील प्रसिद्ध सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन (HND) होस्टेल आणि भगवान महावीर मंदिर वाचवण्यासाठी तसेच कथित करार रद्द करण्याच्या मागणीसाठी फलटण येथील सकल जैन समाजातर्फे उद्या, बुधवार दिनांक २९/१०/२०२५ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा सकाळी ठीक ८.३० वाजता शहरातील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून सुरू होणार आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात आणि मंदिर गहाण ठेवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सकल जैन समाज फलटण यांनी या वादाकडे शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकजूट दाखवत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सकल जैन समाज फलटणने समाजबांधवांना, विशेषतः युवक-युवतींना, या महत्त्वाच्या लढ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे. जैन धर्माच्या या महत्त्वपूर्ण वारसास्थळांच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आपले नम्र,
सकल जैन समाज फलटण