गोखळी वार्ताहर- राधेश्याम जाधव. मौजे गोखळी येथे शांतिदास महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी व दत्त जयंती निमित्त भव्य व दिव्य श्वान शर्यत मैदान (वर्ष – २) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेत तब्बल ७० श्वान स्पर्धकांनी सहभाग नोंदवत रंगतदार स्पर्धेची मेजवानी सादर केली.
स्पर्धेतील १ ते १० क्रमांक विजेते व त्यांना देण्यात येणारी रोख रक्कम व चषक पुढीलप्रमाणे :
1. राजलक्ष्मी झुमकी रेसिंग क्लब, नेर आदर्की – प्रथम क्रमांक – ₹११,०००/- व आकर्षक चषक
2. ऑस्कर ब्ल्यू हिंदकेसरी लारा फॅन्स क्लब, आनवडी–कवठे क्षेत्रमाहुली – द्वितीय क्रमांक – ₹७,०००/- व चषक
3. विश्वास पै रणवीर भैय्या शिंदे, पंढरपूर – तृतीय क्रमांक – ₹५,०००/- व चषक
4. ब्रिंडल परी – गणेश मदने, गोखळी – चतुर्थ क्रमांक – ₹३,०००/- व चषक
5. पायलट रावण रेसिंग क्लब – पंचम क्रमांक – ₹२,०००/- व चषक
6. डार्लिंग महाराष्ट्र चॅम्पियन फिनिश बॉय फॅन्स क्लब – सहावा क्रमांक – ₹१,५००/- व चषक
7. अवंतिका – शांतिदास महाराज प्रसन्न, गोखळी – सातवा क्रमांक – ₹१,५००/- व चषक
8. डेविल 441 – जोतीलिंग प्रसन्न, येलुर – आठवा क्रमांक – ₹१,५००/- व चषक
9. कोयना गर्ल – पै. शंकर दादा वलेकर, उंबरमळे – नववा क्रमांक – ₹१,५००/- व चषक
10. ब्रदर्स ग्रुप महाराष्ट्र – एलेक्सा 11 – दहावा क्रमांक – ₹१,५००/- व चषक
याशिवाय इतर ४८ पारितोषिकेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे समालोचक – प्रकाशबुवा महागावकर,
काढणी मेकर – पै. गणेश शिंदे (पंढरपूरकर),
मशीन मेकर – गणेश बुधावले (निंबवडे)
तर पंच म्हणून पै. महेश जाधव (मंगळवेढा), पै. विराज मगर, विशाल कोळेकर (माळशिरस) व अजय (बल्ली) राठोड यांनी काम पाहिले.शर्यतीदरम्यान गोखळी व पंचक्रोशीतील हजारो श्वानप्रेमींनी उपस्थित राहून उत्सवाला मोठी रंगत आणली.