फलटण (ता.१४ सप्टेंबर) : श्रीराम ग्रामीण पतसंस्थेची २५ वी वार्षिक साधारण सभा डॉ. शिवाजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सचिव महेश जगताप काका यांनी विषयपत्रिका व वार्षिक अहवाल सादर केला. सर्व विषयांवर झालेल्या चर्चेतून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.आर्थिक वर्षात 26.99 लक्ष रुपये नफा झाला.. ढोबळ NPA 6 % व नेट NPA .70% राखले आहेत.एकूण ठेवी 15 कोटी TR कर्ज 11.50 कोटी रुपये वाटप केले आहे.. तरलता प्रमाण योग्य राखले असून सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण करण्यात येते.. तसेच कर्जदार सभासद निधन झाले तर अनुकंपा निधीतून वारस व्यक्तीस कर्ज फेडीसाठी मदत दिली जाते. संचालक मंडळाने सुचवलेल्या नफा वाटणीस मान्यता देण्यात आली..सभेत नफा वाटपातून सभासदांना ९ टक्के लाभांश रक्कम ११४४२५५, रेग्युलर कर्ज फेडणाऱ्या सभासदांना १३ टक्के व्याज रिबेट रक्कम ४८९८९४, तर कर्मचाऱ्यांना ३० टक्के बोनस रक्कम २८१०६५जाहीर करण्यात आला. पिग्मी कलेक्शन एजंट ना भेट रक्कम २५०४५ भेटवस्तू देण्यासाठी तरतूद ४८११७२ असे एकूण २४२१४३१ रुपये वाटप होणार आहे..तसेच सर्व मध्य व दीर्घ मुदत कर्जदार सभासदांना २ लाख रुपयांचे एलआयसी विमा संरक्षण देण्यात येत आहे..सुधारित उपविधीवर चर्चेत जमिनी, सोने व प्लॉट खरेदीसाठी कर्ज बंद करण्याचे प्रस्ताव अयोग्य असल्याचे मत व्यक्त झाले. कर्जदार व जामीनदारांची संपूर्ण माहिती, assets and liabilities कर्ज अर्जात नमूद करणे आवश्यक ठरले. सोने तारण कर्जासाठी दरमहा हप्त्याऐवजी १२ महिन्यांची (बुलेट पेमेंट)एकरकमी परतफेड करण्याची सूचना सभासद अनिल धुमाळ यांनी मांडली. त्यासाठी व्याजदर ९ टक्क्यांवरून ९.५ टक्के करण्यास सभेने मान्यता दिली.पिग्मी कलेक्शन कमिशन ३ टक्क्यांवरून २.५ टक्के करण्याची सूचना सुधारित उपविधी मध्ये केली आहे. एजंट आता पिग्मीबरोबर सेव्हिंग ठेवी व कर्जहप्ते स्वीकारतील, मात्र त्यासाठी वेगळे कमिशन मिळणार नाही.ठेवीना विमा संरक्षणासाठी शासनाने सुचविलेल्या तरलता व स्थिरीकरण निधी (अंशदान योजना) वरही चर्चा झाली. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या संस्था वाचविण्यासाठी ही योजना राबवली जात असल्याची शंका व्यक्त करत, सध्या अंशदान भरू नये व राज्य फेडरेशन तसेच सहकार खात्याने सुधारित योजना आणावी, असा ठराव सभेने केला.संस्थेचे भागभांडवल मर्यादा प्रति व्यक्ती २ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली. निवडणूक अर्जासाठी उपविधीतील तरतुदीपेक्षा अधिक भागभांडवल व ठेव आवश्यक राहणार आहे. संस्थेस नफा झाल्यास संचालक मंडळालाही वाटा असावा, मात्र त्याचे प्रमाण ठरविण्याचा अधिकार वार्षिक सभेला द्यावा, असे ठरले.प्रशासकीय पातळीवर ठेव विभाग, कर्ज विभाग, वसुली व कार्यालयीन काम सुटसुटीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तक्रार निवारण समिती तसेच महिला अत्याचार विरोधी समिती स्थापन करण्यात आल्या. महिला बचत गटातील सर्व महिलांना संस्थेचे सभासदत्व दिले जाणार आहे. अपूर्ण KYC असलेल्या सभासदांना लेखी नोटीस देऊन पूर्तता न केल्यास सभासदत्व रद्द करण्याची सूचना देण्यात आली.सभेच्या प्रारंभी दिवंगत मान्यवर नागरिक, सैनिक, नेतेमंडळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेषतः प्रा. रमेश आढाव व पत्रकार राजेंद्र भागवत यांना श्रद्धांजली वाहिली.राजेंद्र भागवत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी नफ्यातून तरतूद करून अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.सभेत आपली संस्था 25वर्षाची झाली असून रौप्य महोत्सव साजरा करण्यात यावा अशी सूचना करण्यात आली.. सभेत सर्व विषय चर्चा करून मान्य केले मात्र स्थिरीकरण व तरलता आणि उपविधी मध्ये काही बदल सुचविण्याचे ठरवून ते बदल सहकार खात्यास कळविण्यात यावेत तोपर्यंत अंशदान रक्कम वर्ग करू नये अशी सूचना करण्यात आली..शेवटी आभार मानून अल्पोपहार होऊन सभा संपली