सातारा: फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त उद्या, दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२५ रोजी अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथे 'भारतातील पहिले भव्य टेक्निकल प्रकल्प प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे.संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात संपूर्ण भारतातून विक्रमी प्रतिसाद मिळाला असून, ७०० हून अधिक प्रकल्प मांडण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण प्रकल्पांची मांदियाळी या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.या प्रकल्प प्रदर्शनाची व्याप्ती राष्ट्रीय स्तरावरची असून,महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान यांसारख्या विविध राज्यांमधून विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्यांचे दर्शन घडवेल.अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी तसेच पालकांना या भव्य तांत्रिक प्रकल्पांच्या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन करण्यात येत आ
हे.