फलटण प्रतिनिधि: श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आणि लायन्स क्लब, फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या एकसष्टी निमित्त चला बोलूया मानसिक आरोग्यावर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. राजश्री नाळे, मानसोपचार तज्ञ उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला मान्यवर म्हणून सौ. संध्या गायकवाड, अध्यक्ष, लायन्स क्लब, फलटण गोल्डन, सौ. उज्वला निंबाळकर, सेक्रेटरी, लायन्स क्लब, फलटण गोल्डन उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी करताना प्रमुख मान्यवरांची ओळख, मानसिक आरोग्य महत्व, बदलत्या जीवनातील वैचारिकता, बदलेले मानसिक आरोग्य, दैनंदिन जीवनातील ताण तणाव, पालक व विद्यार्थी यांची बदलेली मानसिकता, विद्यार्थी जीवनातील बदलेली विचार प्रणाली, सामाजिक माध्यमांचा दैनदिन जीवनातील मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम या विविध विषयांवर प्रतिपादन केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजश्री नाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याची बदलेली पालकत्वाची शैली, मानसिक आरोग्य संकल्पना, मनाची एकाग्रता, स्व संवाद, मनाचे संतुलन व मनाचे शरीरावरील होणारे परिणाम, मनाची चंचलता, मनाची ऊर्जा व मनाचे प्रकार, भावना व सवयींचा मनावरील होणारे परिणाम, मनाचे आजार जसे की ताण तणाव, भीती, काळजी, नैराश्य इ. होणारे परिणाम, मानवी जीवनातील आनंदी व दुःखी हार्मोन, शरीरातील ऊर्जा संग्रहित करणे, मानसिक संमोहन, मानसिक आरोग्य व जीवनातील यश अपयश संबंध, मनाची एकाग्रता, दैनंदिन जीवनात सामाजिक माध्यमावरील नियंत्रण, जीवनातील विचारांची स्पष्टता, मानसिक आरोग्यासाठी सकारात्मकता, प्रतिक्रियांवर नियंत्रण, उत्तम मानसिक आरोग्यासाठी मनाचे ध्यान व एकाग्रता, विचारांवर नियंत्रण व स्वतःशी स्वसंवाद करणे महत्वपूर्ण आहेत तसेच विद्यार्थी जीवनातील ध्यानाचे महत्व, आयुष्यातील भावना व विचारांवर नियंत्रण, भावनेवरील व विचारावरील स्वतंत्रता तंत्रज्ञान (EFT), विद्यार्थी जीवनातील सकारात्मकतेचा व नकारात्मक विचारांचे होणारे परिणाम, भावनांवरील व विचारावरील समुपदेशन करून यश मिळवणे, मानसिक आरोग्यद्वारे दैनंदिन जीवनातील समतोल राखणे, जीवनातील सहनशीलता व्यवस्थापन, मानसिक समतोल व शेवटी विद्यार्थ्यांना मानसिक समतोल राखण्यासाठी ईश्वरीय प्रार्थना देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवनातील मानसिक आरोग्य परिवर्तन, मानसिक आरोग्य जपण्यासाठी विविध उपाययोजना, विद्यार्थी जीवनातील सकारात्मक निर्णय घेण्याची क्षमता, मानसिकता जपण्यासाठी शारीरिक लवचिकता, अन्न सेवन करतानाची एकाग्रता आणि मानसिक आरोग्य परस्पर संबंध, मानसिक आरोग्यसाठी विविध योग प्रकार व महत्व सविस्तर मार्गदर्शन केले. लायन्स क्लब, फलटणच्या अध्यक्ष सौ. संध्या गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना आरोग्यविषयक विविध उपक्रम, दैनदिन जीवनातील समस्या व परिस्थिती, मनाची खंभिरता या विषयावर सविस्तर प्रतिपादन केले. व्याख्यानाला दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. ए. एस. रासकर व आभार प्रदर्शन प्रा. पी. व्हि. भोसले यांनी केले. *(शब्द लेखन : डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि विस्तार विभाग)*