फलटण- रक्षक रयतेचा न्यूज व महिला मंच फलटण तर्फे नवरात्रीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा आणि दि २८ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन माळजाई मंदिर येथे करण्यात आलेले आहे.रक्षक रयतेचा न्यूज व महिला मंच, गगनगिरी ज्वेलर्स फलटण,लायन्स क्लब माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण व नंदाज युनिक किचन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नवरंग नवरात्री फोटो स्पर्धा महिलांसाठी ठेवण्यात आली आहे. यामध्ये नऊ रंगातील साडीच्या वेशभूषेतील फोटो दररोज खालील नंबर वर पाठवायचे असून यामध्ये ज्याचा नंबर येईल त्या ग्रुपमधील प्रत्येक महिलेला बक्षीस मिळणार आहे. दररोज प्रत्येक रंगाला बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासाठी १५० रुपये प्रवेश फी स्वतंत्र ठेवण्यात आली आहे. याचा बक्षीस वितरण दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माळजाई मंदिर येथे होणार आहे. त्याचबरोबर पाककला स्पर्धा {उपवासाचे पदार्थ} ठेवण्यात आली असून प्रत्येकाने घरून पदार्थ बनवून आणायचे आहेत जो पदार्थ बनवला आहे त्याची रेसिपी व स्पर्धकाचे नाव मोबाईल नंबर सह असावे या स्पर्धेत सहभागी प्रत्येकाला हमखास गिफ्ट मिळणार आहे. यामध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात येणार आहे. यासाठी 100 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.त्याचबरोबर दिनांक 28 रोजी महाभोंडला व खुल्या दांडिया(मोफत) कार्यक्रम ठेवण्यात आला असून याची पूर्व नाव नोंदणी करणे गरजेचे आहे सर्व कार्यक्रम माळजाई मंदिर फलटण येथे दिनांक 28 रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा - सौं असिफा शिकलगार 8010 2390 62, सौं रूपाली कचरे 92 26 72 0 881, सौ नंदा बोराटे 9766000320, निता दोशी 94 20 99 99 17, सौ मनीषा घडिया 70 20 46 76 82 प्रियांका सस्ते 92 84 27 49 13 सौ सुवर्णा शिंदे 74 98 61 81 83, सौं अनुराधा रणवरे 86 68 33 63 13,,उज्वला गोरे 88 30 31 12 13