फलटण (प्रतिनिधी): पारंपरिक शेतीला आधुनिक विज्ञानाची जोड देण्यात फलटण तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आता याच पावलावर पाऊल टाकत, फलटण तालुक्यातील फळबागांचे रक्षण आणि व्यवस्थापन चक्क कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) करणार आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा राज्यातील पहिलाच प्रयोग फलटणमधील चार गावांत पथदर्शी म्हणून राबविला जात आहे.
फलटणमधील 'या' गावांची झाली निवड जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभागाच्या वतीने फलटण तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा धुमाळवाडी, गिरवी, बोडकेवाडी आणि निरगुडी या चार गावांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. या गावातील फळबागांना आता 'एआय' तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे.
काय आहे हे 'एआय' तंत्रज्ञान? आतापर्यंत शेतकरी निसर्गाच्या भरवशावर शेती करत होता, मात्र आता फळबागांच्या शेतात एआय सेन्सर्स बसवले जाणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे फलटणच्या शेतकऱ्यांना खालील फायदे मिळणार आहेत:
प्रशासनाचा 'स्मार्ट' पुढाकार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या आधुनिक प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, फलटणच्या कोरडवाहू पट्ट्यातील फळबागांना यामुळे संजीवनी मिळणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी स्पष्ट केले की, केवळ मशीन बसवून न थांबता शेतकऱ्यांना तंत्रज्ञान हाताळण्याचे विशेष प्रशिक्षणही दिले जाईल.
फलटणसाठी महत्त्वाचे मुद्दे: निवडलेली गावे: धुमाळवाडी, गिरवी, बोडकेवाडी, निरगुडी.
"फलटणचा शेतकरी आता हाय-टेक झाला असून, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने फलटणची फळे आता थेट सातासमुद्रापार निर्यात होण्यासाठी सज्ज होत आहेत."