सातारा: सातारा जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सातारा जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या 'पोलीस चारित्र्य पडताळणी' (Police Character Verification) प्रमाणपत्रासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा (जिल्हा विशेष शाखा) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि वेळेत अर्ज सादर करण्यासाठी सर्व उमेदवारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, सातारा यांनी केले आहे.