म्हसवड (प्रतिनिधी):
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP–2020 2.0) अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमानुसार, बी.एस्सी. भाग दोन (सत्र तीन) साठी “Minor V: Association and Correlation Analysis” या पाठ्यपुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. लातूर येथील 'ज्योतीचंद्र पब्लिकेशन'ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
विद्यार्थीभिमुख मांडणी आणि तज्ज्ञ लेखकांचे योगदान
या पुस्तकात संख्याशास्त्रातील क्लिष्ट संकल्पनांची शास्त्रीय, सुलभ आणि अभ्यासक्रमाभिमुख मांडणी करण्यात आली आहे. सोपी उदाहरणे आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोन यामुळे विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक आकलन दृढ होऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखन खालील तज्ज्ञ प्राध्यापकांनी संयुक्तरित्या केले आहे:
प्रा. हर्षवर्धन श्रीकांत कुलकर्णी (श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड)
प्रा. राकेश हरिचंद्र वाघ (एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे)
प्रा. ज्ञानेश्वर एकनाथ नरवडे (देओगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर)
प्रा. प्रियांका श्रीकांत कुलकर्णी (नूतन मराठी विद्यालय, पुणे)
दिमाखदार प्रकाशन सोहळा
सदर पुस्तकाचे प्रकाशन प.पू. गोविंद महाराज उपळेकर मंदिर संस्थेच्या विश्वस्त समितीच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. अरविंद रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि खजिनदार मा. हेमंत रानडे यांनी लेखकांचे विशेष अभिनंदन केले.
तसेच, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ॲड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, आणि म्हसवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांनीही लेखकांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे पुस्तक पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.