फलटण-लोणंद रस्ता अपघाताने हादरला; दोन दिवसांत दुसरा भीषण अपघात, तरुण गंभीर!
फलटण: प्रतिनिधीफलटण-लोणंद रस्त्यावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेईना. वडजल येथील अपघाताची घटना ताजी असतानाच, रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महाराजा हॉटेल आणि संग्राम पेट्रोल पंपाच्या दरम्यान ह्युंदाई ऑरा कार आणि पल्सर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वीच वडजल येथे भीषण अपघात झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा याच मार्गावर रक्ताचा सडा पडला आहे. सोमेश्वर येथील मालकीची असलेली ह्युंदाई ऑरा कार आणि पल्सर दुचाकी यांच्यात ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताची भीषणता:लोणंद-फलटण रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढती वाहतूक आणि वेगावरील नियंत्रण सुटल्याने हे अपघात होत असल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.