
फलटण- फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी 'ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प' कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक ऍप्लिकेशनबाबत प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्याना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषिदुत तुषार अभंग, अनुप बनकर, अजय बिचुकले, अथर्व डाके,ऋषिकेश जाधव, संग्राम जगताप, साहिल बनसोडे यांनी ई पिक पाहणी, प्लांटिक्स, ऍग्रोस्टार, बायर फार्मराईज, महाडिबीटी फार्मर, भारत ऍग्री, महाविस्तार-एआय, e-NAM, Bighaat, इत्यादी मोबाइलमधील शेतीविषयक ऍप्लिकेशन ची ओळख शेतकऱ्यांना करून दिली तसेच याबाबत मार्गदर्शन केले. या ॲप द्वारे पिक लागवड, बाजारभाव, हवामान अंदाज, पूरक बियाणे, कीटकनाशके व खते बाजारभाव, प्रगतशील शेतीची माहिती मिळून शेतीचे अर्थनियोजन करण्यासाठी कशी मदत होते याविषयी माहिती दिली.
कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नीतिषा पंडित, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.