वाकड येथील आय.आय.ई.बी.एम. संस्था संचलित इंडस बिझनेस स्कूलच्या वतीने आयोजित "पराक्रम" वार्षिक क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरवात झाली. यामध्ये क्रिकेट, खो- खो ,कब्बडी ,बॅडमिंटन , हॉलीबॉल टेबल,टेनिस ,चेस ,कॅरम, मैदानी व इतर २३ खेळांचा समावेश आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय टेबल टेनिस पदक विजेते संतोष वक्राडकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्यावेळी वक्राडकर म्हणाले तरुणांनो खेळ हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला पाहिजे निरोगी आयुष्य जगायचं असेल तर खेळत राहा ही स्पर्धा होत आहे त्याचा अतिशय आनंद होत आहे त्यात हार जीत होत राहील त्याचा विचार करू नका आपण निरोगी आयुष्यासाठी सतत खेळत राहिले पाहिजे
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह, व्यवस्थापकीय संचालक डॉ.जयसिंग मारवाह,अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, प्रशासन कर्नल रविंद्र कुमार,संचालक राजीव सिंग, क्रीडा समिती प्रमुख प्रा.सदानंद पेटकर, प्रा.विशाल देसाई, संदिप कणसे समन्वयक बापू पवार, सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते