बारामती:महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बारामती येथे खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरात सहभागी होत, या तिन्ही नेत्यांनी त्यांचे सांत्वन केले.
या भेटीवेळी पवार कुटुंबीयांचे इतर सदस्य आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. "अजित दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे," अशा शब्दांत नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.