फलटण (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यातील गुणवरे जिल्हा परिषद गटात आता राजकीय हालचालींना वेग आला असून, सरडे येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोसले यांच्या पत्नी सौ. उमा भोसले यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आदेश दिल्यास आपण शिवसेना पक्षातून निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याची माहिती सौ. उमा भोसले यांनी दिली आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
सौ. उमा भोसले यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवेसाठी निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहोत. सरडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दत्ता भोसले यांनी केलेल्या विकासकामांची शिदोरी सोबत असल्याने जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.