फलटण:विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व कळावे आणि शाळेच्या परिसरात सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सातारा जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत फलटण तालुक्यातील फडतरवाडी प्राथमिक शाळेने विशेष छाप पाडली आहे. या स्पर्धेत फडतरवाडी शाळेला प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
जिल्हास्तरीय समितीने प्रत्यक्ष शाळांची पाहणी करून हा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील शाळांनी यश मिळवले:
जिल्ह्यातील शेकडो शाळांमधून निवडक शाळांना या पारितोषिकांसाठी निवडण्यात आले होते. यामध्ये फलटण तालुक्यातील फडतरवाडी शाळेने आपली परसबाग उत्तमरीत्या फुलवल्याबद्दल जिल्हास्तरीय समितीने त्यांची प्रोत्साहनपर पारितोषिकासाठी निवड केली. फडतरवाडीसोबतच म्हाळुंगेवाडी (ता. पाटण) आणि वस्ती साकुर्डी (ता. कऱ्हाड) या शाळांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे मिळाली आहेत.
या यशस्वी शाळांचे आणि शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, आणि रवींद्र खंदारे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेली ही पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.