२८ मार्च रोजी वाशी येथे होणार दिमाखदार सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई (प्रतिनिधी):
भारतीय माजी सैनिकांचे राष्ट्रीय नेते आणि 'शंभुसेना' प्रमुख श्रीमंत दिपकराजे शिर्के यांना यंदाचा प्रतिष्ठित 'छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२६' जाहीर झाला आहे. त्यांच्या प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि विशेषतः गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात येत असल्याची माहिती छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमित गडांकुश यांनी दिली.
पुरस्काराचे स्वरूप आणि महत्त्व
छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार हा दरवर्षी शिव-शंभु कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या व्यक्तीला प्रदान करण्यात येतो.
२०२५ चा मानकरी: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे.
२०२६ चा मानकरी: महाराणी येसुबाईंच्या माहेरकडील राजेशिर्के घराण्याचे वंशज श्रीमंत दिपकराजे शिर्के.
मान्यवरांची उपस्थिती
वाशी, नवी मुंबई येथे २८ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला ऐतिहासिक राजघराण्यातील वंशजांसह खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:
आय.पी.एस. अधिकारी: मा. दिपक साकोरे
डी.सी.पी. (मुंबई पोलीस): डॉ. राज खतीब
डी.वाय.एस.पी. (ट्रिपल महाराष्ट्र केसरी): पै. विजय चौधरी
सुप्रसिद्ध अभिनेते: विजय पाटकर, रोहित पोपट पिसाळ
सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
दिपकराजे शिर्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिर्के घराणे कोअर कमिटी, गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट, राष्ट्रवादी माजी सैनिक सेल, राजाऊ रेजिमेंट आणि महाराणी येसुबाई सेवा फाऊंडेशन यांसह अनेक संस्था व शिव-शंभु भक्तांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
श्रीमंत दिपकराजे शिर्के हे केवळ एका घराण्याचे वारसदार नसून, त्यांनी माजी सैनिकांच्या प्रश्नांसाठी आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यभर मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याला आता राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची मोहोर उमटली आहे.
कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन छावा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.