वाकड येथील इंडस बिजनेस स्कूल मध्ये नवीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी या उद्देशाने मुलांना नवीन नवीन प्रॉडक्ट तयार करून त्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी चे काम संस्थेतर्फे करण्यात आले त्यातून नवीन उद्योजक तयार व्हावेत हाच उद्देश होता,
त्यासाठी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना नवीन बिजनेस मॉडेल तयार करून बिजनेस बाजारच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली त्यामध्ये 59 ग्रुपने सहभाग नोंदवला आणि एका दिवसामध्ये जवळपास 1200 वरती अधिक लोकांनी यामध्ये या स्टॉलला भेट दिली आणि 3 लाखाच्या पुढे या वस्तूंचा खप झाला त्या माध्यमातून मुलांना वेगवेगळे अनुभव आले आणि बिजनेस ची आयडिया आली.
स्टॉल्समध्ये अन्न आणि पेये, मिठाई आणि पारंपारिक स्वादिष्ट पदार्थ, हस्तनिर्मित हस्तकला, फॅशन आणि अॅक्सेसरीज, गृह आणि सजावट, सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी, पेये आणि मॉकटेल्स, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उपयुक्तता उत्पादने, कला आणि स्टेशनरी आणि पर्यावरणपूरक आणि निरोगीपणा उत्पादने अशा अनेक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करण्यात आले.
या वेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, यांच्या हस्ते बिझनेस बझार चे उद्घाटन झाले डीन डॉ.पुनम निकम, प्रा. अरुणा वालकर यांनी परिश्रम घेतले