सातारा : कराड तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने कराड तालुक्यातील संपुर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतींचे क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार 23 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. तथापि, या आदेशानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अत्यावश्यक सेवेतील दुध घरपोच पुरविणेबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, उपविभाग कराड ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील, त्याप्रमाणे दुध घरपोच वितरण करण्यासाठी सुट दिली आहे