सातारा-जावली मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची तब्ब्येत सुखरूप आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
सातारा : सातारा-जावली मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची तब्ब्येत सुखरूप आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
येत्या दोन दिवसात शिवेंद्र राजे यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे होली फॅमिली रुग्णालयाच्या सूत्रांनी कळविले आहे. बुधवारी रक्तदाब वाढल्याने शिवेंद्रराजे यांना आधी साताऱ्यात नंतर मुंबईत उपचारासाठी हालवण्यात आल्याने सातारा धास्तावला होता. मुंबईत त्यांच्या काही महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी मात्र मी आता ठीक आहे काळजी करू नका, असा संदेश शिवेंद्रराजे भोसले यांनी सोशल मिडियातून दिल्यानंतर काळजीचे वातावरण दूर झाले. मात्र डॉक्टरांनी त्यांना पूर्ण सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. स्वतः वेदांतिकाराजे भोसले या सतत शिवेंदराजे यांच्यासमवेत सावलीसारख्या आहेत. शिवेंद्रराजे विश्रांतीसाठी मुंबईतच थांबणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यासमवेत तातडीने मुंबईला गेलेले शिवेंद्रराजे समर्थक गुरूवारी रात्री माघारी परतले.