माळवाडी ता. कराड येथील देशपांडा नावाच्या शिवारात महिलेच्या डोक्यावर, कानावर दगडाने प्रहार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन शंकर शेलार (वय 45 रा.
कराड : माळवाडी ता. कराड येथील देशपांडा नावाच्या शिवारात महिलेच्या डोक्यावर, कानावर दगडाने प्रहार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन शंकर शेलार (वय 45 रा. माळवाडी ता. कराड) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमन शेलार गुरुवारी दुपारी देशपांडा नावाच्या शिवारात वैरणीसाठी गेल्या होत्या. दरम्यान अज्ञाताने अचानक पणे त्यांच्यावरती दागिने ओढण्याच्या हेतूने प्रहार केला. यादरम्यान कानातील दागिने चोरण्याचे उद्देशाने ते जोराने हिसकावले त्यामुळे दोन्ही कान तुटलेल्या अवस्थेत होते. दरम्यान महिलेचा मृतदेह फरफटत नेउन ओढ्यात कामरे एवढ्या पाण्यात तारेने बांधून ठेवला होता. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत मसूर पोलीस दूरक्षेत्राचे सुरू होते.