फलटण (प्रतिनिधी): फलटण शहर पोलिसांनी एका धडाकेबाज कारवाईत रेकॉर्डवरील तडीपार गुंडाला सातारा जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. सोनल गणेश इंगळे ऊर्फ 'ढोबळ्या' (वय २१, रा. आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक ०७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे हे आपल्या डी.बी. पथकासह हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक तडीपार इसम फलटण शहरातील बीएसएनएल ऑफिस परिसरात फिरत आहे.
माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने बीएसएनएल ऑफिस समोरील रस्त्यावर सापळा रचला. पोलिसांची चाहुल लागताच आरोपी सोनल ऊर्फ ढोबळ्या याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपी सोनल इंगळे याला खालील भागातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते:
तडीपारीचा आदेश झुगारून शहरात प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सपोनि नितीन शिंदे, पोहवा संतोष नाळे, पोकॉ जितेंद्र टिके आणि पोकॉ अतुल बडे यांचा समावेश होता.