सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा येथे विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर मा अजय कुलकर्णी साहेब यांनी यावेळी कृषि विभागा मार्फत फुले सुपर केन नर्सरी पासून ऊस लागवड श्री मच्छिंद्र मुळीक शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्र भेट दिली तसेच त्यांनी ऊस रोपवाटिका द्वारे तयार करताना वापरलेलं तंत्रज्ञान तसेच बेणे प्रक्रिया, खत बेसल डोस वापर, 7 फूट × 1.5 फूट अंतर वरती पट्टा पद्धतीद्वारे उसाची लागवड 0.40 गुंठे क्षेत्रात 4000 रोपाची लागवड केले आहे एका उसाला 8 ते 14 फुटवे आहेत एका उसाचे 2 किलो प्रमाणे वजन अपेक्षित ठेवल्यास एकरी 100 टन उत्पादन निघणार आहे प्रशेत्र भेटी च्या प्रसंगी चर्चा करण्यात आलीकृषी विभागामार्फत सासकल गावात 18 सुपर केन नर्सरी द्वारे 90000 हजार रोपे तयार करून 22 एकर क्षेत्रावर वरती ऊस लागवड करण्यात आले आहे कमी खर्चा मध्ये ऊस उत्पादन वाढ फुले सुपर केन नर्सरीद्वारे शक्य असल्याचे शेतकऱ्यांनी ऊस रोपे द्वारेच उसाची लागवड करणे बाबत यावेळी आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर अजय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण मा खलीद मोमीन, तालूका कृषि अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी विडणी शहाजी शिंदे, कृषि पर्यवेक्षक अजित सोनवलकर, कृषी सेव रत्न कृषी सहाय्यक सचिन जाधव सस्कल पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते