फलटण प्रतिनिधि साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण यांच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट पुस्तकांना राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार देऊन साहित्यिकांना गौरविले जाते. यावर्षी मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय माणदेशी युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे आयोजन दहिवडी येथे संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ, 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस, विनोद कुलकर्णी, प्रकाश होळकर सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, ज्येष्ठ साहित्यिक जयवंत अवघडे, स्वराज अकॅडमी चे संस्थापक सुनील काटकर, साहित्यिक संवाद युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष महादेवराव गुंजवटे यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन होणार आहे. अशी माहिती स्वागताध्यक्ष व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी दिली. राज्यभरातून उदंड असा प्रतिसाद साहित्यिकांकडून मिळाला. राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार गंगाराम कुचेकर- स्त्री जन्माची शिक्षा मृत्युदंडाची, सौ मंगल कुमावत,- भूतान भटकंती, आकाश भोरडे- झालं बाटुकाचं जिण, सौ संध्या धर्माधिकारी- बेर, मुकुंदराज कुलकर्णी -वटवृक्षाच्या सावलीत, भारत सातपुते -जागरण, रंजना सानप -स्वानंदी जगणं राजेंद्र घाडगे -शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे, लक्ष्मण शिंदे -हिरव्या वाटा, डॉ स्नेहा राणे -बाळभूक, प्रकाश पोळ- कातरवेळ, सुनील शेडगे -रेडी ते रेवस, सचिन अवघडे- फक्कड, आशा नेगी -ब्युटी ऑफ लाईफ, सुनील दबडे- बनगी आणि बिरमुट,सतीश अंभईकर -शूरा मी वंदिले, डॉ सोनिया कस्तुरे- हसरे किनारे, सौ संगीता ठलाल- रानभाज्यांच्या जगात, पल्लवी बनसोडे -अधोरेखित दिवाळी अंक यांना जाहीर झाले आहेत. समारोप सत्रामध्ये पुरस्कार वितरण रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, ज्येष्ठ विचारवंत रवींद्र येवले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर डॉ अनिल दडस यांच्या शुभहस्ते महावस्त्र, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तके भेट देऊन राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, समन्वयक सुरेखा आवळे,सचिव राजेश पाटोळे, ज्येष्ठ साहित्यिक महादेवराव गुंजवटे, कवी मोहसीन आतार यांनी केले.