शिवसेना-काँग्रेस-कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवाराला नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा
फलटण, : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रभाग क्रमांक १३ (ब) मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. निर्मला शशिकांत काकडे देशमुख यांच्या बाजूने जोरदार वातावरण तयार झाले आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्या आता सज्ज झाल्या असून, त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
सौ. निर्मला काकडे देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच प्रभागात त्यांच्या कामाची चर्चा सुरू झाली आहे. केवळ आश्वासने न देता, त्या योजलेल्या विकासकामांची ब्लू प्रिंट घेऊन मतदारांसमोर जात आहेत. त्यांना निवडून आणणे का गरजेचे आहे, याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात निर्मला काकडे देशमुख यांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "माझा लढा केवळ एका जागेसाठी नाही, तर प्रभागाच्या उज्वल भविष्यासाठी आहे. मला आपले एक मत म्हणजे विकासाच्या कामाला दिलेले बळ ठरणार आहे. विकासासाठी सक्षम नेतृत्त्वाला संधी देण्यासाठी, तुम्ही मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे."
प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देत असल्याने, सौ. निर्मला शशिकांत काकडे देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात आहे.