सातारा दि.2: शासकीय कार्यालयासाठी १०० दिवसांच्या कृती आराखडा मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निश्चित केला. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी जिल्हास्तरीय, विभागीयस्तरीय कार्यालयांना विश्वस्त कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या विश्वस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी विश्वस्त परिषद,कार्यशाळेचे आयोजन दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ०१.३० वाजेपर्यंत धनंजय गाडगीळ वाणिज्य कॉलेज, सातारा (DG College) सदर बझार, सातारा येथे करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती सी. एम. ढबाले यांनी केले आहे. कार्यालय, सातारा व चॅरीटी बार असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने उपरोक्त नमूद ठिकाणी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या विश्वस्तांना मार्गदर्शन करणेकरीता विश्वस्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वस्त परिषदेमध्ये मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील तरतुदी तसेच न्यासाच्या कामकाजा संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सदर मार्गदर्शनाचा लाभ सर्व विश्वस्तांनी घ्यावा असे आवाहनही सहायक धर्मादाय आयुक्त यांनी केले आह.