फलटण:सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यासह राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान संपत आहे, त्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने या निवडणुकांसाठीचा अधिकृत प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला असून, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, प्रभाग पाडण्यापासून ते अंतिम प्रसिद्धीपर्यंतचे टप्पे खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना मांडता येणार आहेत:
जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेची नमुना 'अ' मध्ये व्यापक प्रसिद्धी ४ मे २०२६ रोजी केली जाईल. या प्रसिद्धीनंतरच संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याचा मार्ग मोकळा होईल.
महत्वाची टीप: निवडणूक प्रक्रिया सुरू असेपर्यंत संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीत किंवा क्षेत्रात कोणताही बदल करता येणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.