फलटण : फलटण - कोरेगांव विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या सचिन पाटील यांचा पराभव दिसत असल्याने सिने अभिनेते गावोगावी फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याची टिका फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव जगताप यांनी केली आहे. कोळकी (ता.फलटण) सह मतदारसंघात विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ सिने अभिनेते भाऊ कदम यांनी दौरा केला. त्ंयावर टिका करताना बापूराव जगताप पुढे म्हणाले, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी राजे गटाचे कट्टर समर्थक कार्यकर्ते, नेते यांची मदत घेऊन प्रत्येक गाव पिंजून काढले असून रोज त्यांच्याशी संपर्क वाढवला आहे. घर टू घर भेटी घेत श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्या सर्वांनी दीपक चव्हाण यांची चौथ्यांदा निवडून येण्यासाठी घोडदौड सुरू ठेवली आहे. मतदारांच्या आशिर्वादाच्या जोरावर दीपक चव्हाण हे चौथ्यांदा नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत. सुसंस्कृत राजकारणाच्या बळावर व मुत्सद्दीगिरीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराची रणधुमाळी सांभाळली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण यांचा चौथ्यांदा विजय हा निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे विरोधकांना मतदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने विनोदी सिने अभिनेते त्यांना मतदार संघात फिरवायला लागत आहेत. लोकांना हसवून आपलंस करण्याचा प्रयत्न करण्याची विरोधकांवर आलेली परिस्थिती हस्यास्पद असल्याची उपरोधिक टिकाही बापूराव जगताप यांनी केली आहे. आमदार दीपक चव्हाण चौथ्यांदा आमदार होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास