फलटण-गेली 50 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल फलटण मधील ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद भाई मेहता साहेब व सौ इंदुमती मेहता काकी यांचा अमृत महोत्सवा निमित्त फलटण नगरीमध्ये नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन सोशल ग्रुप फलटण कडून मा.श्री.अरविंद भाई मेहता साहेब व सौ. इंदुमती काकी मेहता यांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.मंगेश दोशी, विद्यमान अध्यक्ष श्री.श्रीपाल जैन,सचिव सौ.निना कोठारी,खजिनदार श्री.राजेश शहा, उपाध्यक्ष श्री. प्रीतम शहा, माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र कोठारी,श्री.सचिन शहा,सह - सचिव श्री. हर्षद गांधी,संचालक श्री.डॉ. मिलिंद दोशी,सौ.मनिषा घडिया,PRO श्री.विशाल शहा , इव्हेंट चेअर पर्सन श्री.तुषार शहा व सदस्य श्री.डॉ. ऋषिकेश राजवैद्य,श्री. राहुल गांधी व बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी बोलताना श्रीपाल जैन यांनी मेहता साहेबांचे जैन सोशल ग्रुप ला नेहमीच सर्वोतोपरी सहकार्य व मार्गदर्शन लाभते असे नमुद केले.