Gold Price Today, सोने चांदी आजचा भाव, २४ सप्टेंबर २०२० : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी व्यापारी सत्रात गुरूवारी सोने आणि चांदीत घसरणीचे सातत्य कायम आहे. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी ११ वाजून ०७ मिनिटांवर पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.४२ टक्के म्हणजे २०८ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ४९ हजार ३०० रुपयांवर ट्रेंड करत होता. गेल्या सत्रात ऑक्टोबरच्या कराराच्या सोन्याचा भाव ४९ हजार ५०८ रुपये १० ग्रॅम होता. या सोबत डिसेंबरच्या वायदा सोन्याची किंमती एमसीएक्सवर ०.३३ टक्के म्हणजे १६५ रुपयांच्या घटीसह ४९ हजार ३८५ रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे. फेब्रुवारी २०२१ च्या कराराचे सोन्याचा भाव ७६८ म्हणजे १.५३ टक्क्यांच्या घटी सह ४९ हजार ५७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत होती.
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी व्यापारी सत्रात गुरूवारी चांदीच्या वायदा किंमतीत जबरदस्त घट दिसली आहे. एमसीएक्सवर डिसेंबर २०२० च्या चांदीचा भाव बुधवारी सकाळी ११ वाजून ०९ मिनिटांनी ३.७४ टक्के म्हणजे २१८८ रुपयांच्या घटीसह ५६ हजार ३०० रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. तर मार्च २०२१ च्या चांदीचा वायदा भाव या वेळी ३.६२ टक्के म्हणजे २१७४ रुपयांच्या घटीसह ५७ हजार ९२५ रुपयांवर ट्रेंड करत आहे. गेल्या सत्रात मार्च २०२१ च्या चांदीचा वायदा भाव ५८ हजार ५१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने (Gold Price Today in International Market)
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोने डिसेंबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या १२.८० डॉलर म्हणजे ०.६६ टक्के घटीसह १८५६ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.४८ टक्के म्हणजे ८.९० डॉलरच्या घटीसह १८५४.४४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी सकाळी चांदीत घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर डिसेंबर २०२०च्या कराराची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.८७ डॉलर म्हणजे ३.५९ टक्के घटीसह २३.२३ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ३.२५ टक्के म्हणजे ०.७४ डॉलरच्या घटीसह २२.०४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.
महाराष्ट्रात सोन्यात घट, चांदीत झाली घसरण
सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात घट पाहायला मिळाली. आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ६०० रुपयांनी स्वस्त झाले. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ४०० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४८ हजार ४०० रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ००० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ००० रुपयांवर बंद झाला होता.
सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात घसरण दिसून आली. चांदीत २००० रुपये प्रति किलोची जबरदस्त घट झाली. काल ५९ हजार ००० वर असलेली चांदी आज ५७ हजार ००० रुपयांवर विक्री सुरू आहे.